यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारी मार्गसूचीनुसार यंदाचा संगोळी रायन्ना उत्सव साधेपणात साजरा करण्यात आला. क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर विरज्योतीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नंदी ध्वजारोहण करून हा उत्सव आचरणात आणण्यात आला.

क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचे समाधी स्थळ असलेल्या खानापूर तालुक्यातील नंदगड गावात आलेल्या विरज्योतीचे बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी आणि जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांच्याहस्ते पूजनाने स्वागत झाले. यानंतर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची स्वामी आणि पुजाऱ्यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. 
यावेळी प्रसारमाध्यमांसमवेत बोलताना जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ म्हणाले, दरवर्षी मोठ्या उत्साहात संगोळी रायन्ना उत्सवाचे आचरण करण्यात येते परंतु यंदा कोविडमुळे सरकारी मार्गसूचीनुसार साधेपणात हा उत्सव आचरणात आणण्यात आला.
यावेळी हुतात्मा कैलासनाथ मालबन्नावर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी संगोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे आमदार महांतेश कौजलगी तसेच जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बैलहोंगल उप विभागाधिकारी शशिधर बगली, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री आदींसह गावातील ज्येष्ठ नागरिक, अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments