राज्य सरकारच्या पुढील अर्थसंकल्पात वनखात्याच्या अनुदानात कपात करू नये अशी विनंती बेळगाव जिल्ह्याचे उप वन संरक्षणाधिकारी हर्ष भानू यांनी वनमंत्री उमेश कत्ती यांना केली आहे.

व्हॉईस : हुक्केरी येथील तालुका पंचायत सभागृहात आज, बुधवारी वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी बोलताना हर्ष भानू म्हणाले, राज्य सरकार गेल्या ८ वर्षांपासून वन खात्याच्या अनुदानात दरवर्षी शेकडा ८ ते १० % कपात करत आहे. त्यामुळे वन खात्याला पूर्ण क्षमतेने काम करण्यात अडचण येत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अशी कपात करू नये अशी मागणी त्यांनी केली.
याला सकारात्मक प्रतिसाद देत वनमंत्री उमेश कत्ती म्हणाले, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. वन खात्याच्या अनुदानात कपात करू नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल. त्याचप्रमाणे शहरी भागात वृक्ष लागवड वाढविण्यावर भर देण्यात येईल असे कत्ती यांनी सांगितले. बैठकीला मुख्य वन संरक्षणाधिकारी विजयकुमार सालीमठ, वलय वनाधिकारी प्रसन्न बेल्लद, उप वलय वनाधिकारी गजानन पाटील, प्रदीप मगदूम आदी उपस्थित होते.


Recent Comments