Vijayapura

सिद्धेश्वर स्वामीजींना किरकोळ दुखापत

Share

अपार भक्तसमूह लाभलेल्या विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी पूजेच्या आधी आंघोळीसाठी स्नानगृहात गेले असता पडून किरकोळ जखमी झाले आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी भक्तांनी सोशल मीडियावर मोहीम सुरु केली आहे.

याबाबत आमचे इन न्यूजचे प्रतिनिधी विजयकुमार सारवाड यांनी स्वामीजींच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता, सोमवारी सायंकाळी सिद्धेश्वर स्वामीजी पूजेपूर्वी स्नान करण्यासाठी स्नानगृहात गेले असता पडून किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.

त्यांच्या गुडघ्याजवळ आणि उजव्या हाताला किरकोळ खरचटले आहे. कण्हेरी मठाचे स्वामीजी, हर्षानंद स्वामीजी त्यांची काळजी घेत असून, मिरजेच्या प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांकरवी उपचार करण्यात येत आहेत.  त्यांची प्रकृती स्थिर असून, काही दिवस विश्रांती घेऊन ते पूर्वीप्रमाणेच दैनंदिन प्रवचन व अन्य कामात सहभागी होणार आहेत असे सांगण्यात आले. स्वामीजींच्या पाठीशी भक्तांच्या शुभेच्छा आहेत. भक्तांनी काळजीने भेटण्यासाठी येऊन गर्दी करू नये असे आवाहन सिद्धेश्वर स्वामीजींच्या निकटवर्तीयांनी इन न्यूजच्या माध्यमातून केले आहे.

 

Tags: