बेळगावातील हुतात्मा चौकाजवळील कावेरी कोल्ड्रिंक्सच्या शेजारील बोळात सोमवारी रात्री कचऱ्याला आग लागल्याने स्थानी रहिवाशांच्या घबराट पसरली होती.

बेळगावातील कावेरी कोल्ड्रिंक्सच्या शेजारील बोळात कचरा टाकण्यात येतो. सोमवारी रात्री कोणी अज्ञाताने हा कचरा पेटवून दिल्याची चर्चा आहे. बघताबघता ही आग वाढली आणि शेजारील भिंतीपर्यंत ज्वाळा उठल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. काहींनी अग्निशामक दलाला पाचारण केल्यावर आगीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी प्रयत्नपूर्वक ही आग विझविली. या ठिकाणी वारंवार कचरा पेटवून दिल्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना घडण्याआधीच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.


Recent Comments