Belagavi

नागनूर रुद्राक्षीमठातील वचन साहित्याचे डिजिटलायझेशन

Share

कन्नड साहित्य आणि वाचन साहित्य वाचवण्याच्या उद्देशाने बेळगावमधील नागनूर रुद्राक्षीमठात या साहित्याचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. या कार्याची सुरुवात नागनूर रुद्राक्षीमठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्याहस्ते करण्यात आली.

बेळगावच्या रुद्राक्षीमठातील वचन अध्ययन केंद्रात ४०० हुन अधिक वर्षांपूर्वीचे साहित्य आहे. या साहित्याचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून अशोक देमनूर यांच्या नेतृत्वाखाली नागनूर रुद्राक्ष मठाच्या अल्लमप्रभू स्वामींच्या हस्ते याची सुरुवात करण्यात आली.

यावेळी स्वामीजींनी बोलताना सांगितले कि, कन्नड साहित्य संस्कृती वाचवण्याच्या कार्यात अशोक देमनूर यांचा महत्वाचा वाटा आहे. हजारो पानांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला असून नागनूर रुद्राक्ष अध्ययन केंद्रात आजपासून या कार्याची सुरुवात करण्यात आल्याचे ते म्हणाले.

यावेळी लिंगायत समाजाचे नेते शंकर गुडस म्हणाले, श्रींच्या प्रयत्नातून कन्नड इतिहास वाचविण्याच्या उद्देशाने डिजिटलायझेशनचे काम हाती घेण्यात आले असून या कार्यात अजूनही स्वयंसेवकांची गरज आहे. २० दिवसाच्या कालावधीत या कार्यासाठी कन्नड अभिमानी, वचन साहित्य अभिमानी यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन गुडस यांनी केले.

कन्नड साहित्य, वचन साहित्य आणि कन्नड साहित्याचा इतिहास वाचविण्याच्या दृष्टिकोनातून डिजिटलायझेशनला सुरुवात करण्यात आली आहे.

Tags: