Vijayapura

कौटुंबिक वादातून पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या

Share

 कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील तालिकोटे तालुक्यातील शरणसोमनाळ गावात घडली आहे

होय, विजापूर जिल्ह्यात आज सकाळीच एकल वाईट बातमी समोर आली आहे. तालिकोटे तालुक्यातील शरणसोमनाळ गावात मैबुसाब मकानदार याने दारूच्या नशेत पत्नीशी भांडण काढले. यावेळी त्याने आपल्या ४० वर्षीय पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून तिची हत्या केली. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी झालेल्या पत्नीने जागीच प्राण सोडले. बसवण बागेवाडी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पती मैबुसाब याला बेड्या ठोकल्या. त्याच्या पत्नीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. बसवण बागेवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Tags: