Belagavi

बेळगावात युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

Share

बेळगावातील गांधीनगरजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारील मुचंडी गॅरेजजवळील एका पडक्या इमारतीत युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
होय, रविवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ शेजारील बायपासच्या शेजारील मुचंडी गॅरेजजवळील एका पडक्या इमारतीत युवकाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मृत युवकाची ओळख पटविली. २३ वर्षीय नोहान नासिर धारवाडकर असे मृत युवकाचे नाव असून, तो रुक्मिणीनगरचा रहिवासी आहे. अज्ञातांनी त्याची दगडाने ठेचुन निर्घृण हत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या संदर्भात इन न्यूजला माहिती देताना नोहानच्या एका मित्राने सांगितले की, घरात किरकोळ वाद झाल्याने नोहान शुक्रवारी घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर तो परतला नाही. त्यामुळे आम्ही तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. समाज माध्यमांतही त्याच्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर काहींनी नोहानची रिक्षा या ठिकाणी पाहिल्याचे कळविले. येथे येऊन पहिले तर त्याची निर्घृण हत्या झाल्याचे दिसून आले आहे. त्याच्या कोणी मित्रानेच ही हत्या केली असावी असा संशय त्याने बोलून दाखवला. बाईट
दरम्यान, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व त्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. माळमारुती पोलीसात गुन्हा दाखल करून तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: