कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर फ्रंटलाईन वॉरियर्सना बूस्टर डोस देण्याची मोहीम आज बेळगावात सुरु करण्यात आली.
होय, बेळगावातील पोलीस समुदाय भवनात सोमवारी उत्तरचे आ. अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याहस्ते फ्रंटलाईन वॉरियर्सना बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेचे आज उदघाटन करण्यात आले. यावेळी सांकेतिकरीत्या ५० पोलिसांना बूस्टर डोस देण्यात आला. त्यानंतर फ्रंटलाईन वॉरियर्सनी उत्साहाने येत रांगेत थांबून लशीचा बूस्टर डोस घेतला. जिल्ह्यात बूस्टर डोस घेण्यासाठी ३६ हजार जण पात्र आहेत.


यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात शेकडा ९३ इतके लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात १ लाख ४३ हजार किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. उर्वरित मुलांना आणखी आठवड्याभरात लस देण्यात येईल. आज फ्रंटलाईन वॉरियर्सच्या लसीकरण मोहिमेला प्रारंभ केल्याचे त्यांनी सांगितले. बाईट
त्यानंतर बोलताना आ. अनिल बेनके यांनी, पोलीस, आरोग्य अधिकारी-कर्मचारी या सर्वानी बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले. राज्यात बेंगळुरूनंतर बेळगाव जिल्हा लसीकरणार आघाडीवर आहे. मुलेही उत्साहाने लस घेत आहेत. लवकरच जिल्ह्यात १००% लसीकरण पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाईट
यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, अपर पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी, डीसीपी रवींद्र गडादी, पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आदी उपस्थित होते.


Recent Comments