Belagavi

अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी रुजू

Share

बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून महानिंग नंदगावी यांनी आज कार्यभार स्वीकारला.
चित्रदुर्ग जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणू काम पहात असलेल्या महानिंग नंदगावी यांची बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. आज, सोमवारी त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. नंदगावी यांनी यापूर्वी रामदुर्ग उपविभागाचे डीवायएसपी म्हणून तसेच बेळगाव पोलीस आयुक्तालयात गुन्हे आणि वाहतूक विभागाचे डीसीपी म्हणून काम केले आहे.

Tags: