काहीसा अपवाद वगळता बेळगावात विकेंड कर्फ्यूला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. पोलिसांनी बऱ्यापैकी ढील दिल्याने जनजीवनावर कर्फ्यूचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या डेल्टा आणि ओमीक्रॉनच्या संसर्गाची प्रकरणे राज्य वाढत असल्याने राज्य सरकारने २ आठवड्यांसाठी नाईट कर्फ्यूसोबतच विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. बेळगावात शुक्रवारी रात्रपासून विकेंड कर्फ्यूला प्रारंभ झाला. आधी रात्री १० पासून विकेंड कर्फ्यू सुरु होईल असे सांगून प्रत्यक्षात रात्री ८ वाजताच पोलिसांच्या शहरात शिट्या सुरु झाल्या. त्यामुळे काल रात्री ९च्या सुमारासच बेळगावात सामसूम झाली होती. त्यानंतर आज सकाळपासून खऱ्या अर्थाने विकेंड कर्फ्यूला प्रारंभ झाला. धर्मवीर संभाजी चौक, चन्नम्मा चौक, सीबीटी खडेबाजार, शनिवार खुट, नरगुंदकर भावे चौक, गोवावेस आदी प्रमुख चौकात बॅरिकेड्स लावून नाकेबंदी करण्यात आली आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या अनेकांना पोलीस परत पाठवून देत होते. दरम्यान, किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य साहित्याच्या वस्तूंची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र खरेदीसाठी वेळ निश्चित न केल्याने आवश्यक खरेदीसाठी म्हणून लोक घराबाहेर पडताना दिसले. पोलिसही त्यांना रोखत नसल्याने दुचाकी वाहनांवरून लोक मुक्तपणे फिरताना दिसून आले. फ्लो
Recent Comments