Belagavi

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे ७० रुग्ण; सर्वाधिक ६३ बेळगाव शहर, तालुक्यात

Share

बेळगाव जिल्ह्यात शनिवारीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच राहिली. दिवसभरात जिल्ह्यात ७० नवे रुग्ण आढळून आले. यात सर्वाधिक ६३ रुंग बेळगाव शहर आणि तालुक्यात आढळले आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यू जारी केला असला तरी बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. जिल्ह्यात आज कोरोनाची नवीन ७० प्रकरणे आढळून आली. त्यात सर्वाधिक रुग्ण बेळगाव शहर आणि बेळगाव तालुक्यात आढळले आहेत. अथणी तालुक्यात १, चिक्कोडी तालुक्यात २, गोकाक तालुक्यात ३ तर अन्यत्र १ असे एकूण ७० नवे रुग्ण आज जिल्ह्यात नोंदविण्यात आले.

Tags: