२१ वे शतक ज्ञान–तंत्रज्ञान आणि आविष्काराचे युग आहे. आम्ही जितक्या लवकर ते प्राप्त करतो ते महत्वाचे आहे असे उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वत्थनारायण यांनी सांगितले.

बेळगावातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या सभागृहात बुधवारी लघु उद्योग भारतीच्या वतीने आयोजित ‘टेक भारत-२०२२’ च्या तिसऱ्या सत्रातील ऍग्रीटेक आणि फुडटेक प्री इव्हेंटचे उदघाटन केल्यावर डॉ. अश्वत्थनारायण बोलत होते. तंत्रज्ञानाच्या नवनव्या आविष्कारांनी आपल्या समजा व्यवस्थेत अनेक महत्वाचे बदल घडवून आणले आहेत. कितीतरी अवघड प्रश्नांना चुटकीसरशी उत्तर मिळवून दिले आहे. समाजाच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी लघु उद्योग भारती काम करत आहे. देशातील शेकडा ६० इतके लोक शेतीवर अवलंबून असल्याने कृषी क्षेत्र आमचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल असले पाहिजे. त्यांना सन्मान, दर्जेदार जीवन, समाधान मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांचे जीवन आनंदी झाल्यास आम्हा सर्वांचे जीवन आनंदी होईल. देशाच्या दरडोई उत्पन्नापैकी केवळ १५ % उत्पन्न उद्योग-व्यवसायातून मिळते. हा फरक दूर केला पाहिजे. सर्वांना अभिमान वाटावा अशा पद्धतीने कृषी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे असे मंत्री अश्वत्थनारायण यांनी सांगितले.
शहरांकडे होणारे स्थलांतर सामान्य बाब बनली आहे. मात्र कोरोनाने त्याला ब्रेक लावला आहे. व्हर्च्युअलच्या माध्यमातून लोक जेथे राहता तेथूनच काम करणे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. गावातच आई-वडिलांसोबत राहून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात व्हर्च्युअल, डिजिटलच्या माध्यमातून व्यापार-व्यवसाय करता येणे शक्य आहे. शहरांपेक्षा गावातच निसर्गाच्या सानिध्यात, स्वच्छ वातावरणात राहून उदरनिर्वाह करण्याची संधी तंत्रज्ञानामुळे प्राप्त झाल्याचे अश्वत्थनारायण म्हणाले.
Recent Comments