कर्नाटकात आज कोरोना बाधितांची संख्या दुपटीने वाढली. राज्यात तब्बल ४२४६ नवी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली तर बेळगाव जिल्ह्यातही ३१ रुग्णांची नोंद करण्यात आली.
राज्यात कोरोनाचा आलेख गेल्या आठवडाभरापासून चढताच राहिला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या हेल्थ बुलेटीननुसार राज्यात आज कोरोनाचे नवे ४२४६ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक ३६०५ रुग्ण एकट्या बेंगळूर शहरात आढळले आहेत. त्यामुळे राज्याचा कोरोना संसर्गाचा दर ३.३३ इतका वाढला आहे.
दरम्यान, बुधवारीही बेळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा आलेख चढताच राहिला. जिल्ह्यात आज एकूण ३१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या १७९ झाली आहे.
Recent Comments