बेळगावात आणि राज्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. बेळगाव महानगरपालिकेनेही शहर–परिसरात पुन्हा एकदा जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.


व्हॉईस : कर्नाटकात पुन्हा एकदा कोरोना आणि ओमीक्रॉनचा विस्फोट झाल्याने राज्य सरकारने अनेक कडक उपाययोजना केल्या आहेत. तर बेळगाव पालिकेतर्फे पुन्हा एकदा मास्कचा वापर, सामाजिक अंतर आदींसाठी जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे याबाबत पालिका कर्मचारी जागृती करत आहेत. बुधवारी बेळगाव एपीएमसीत मास्क न घातलेल्या महिलांना त्यांनी मास्कचे वाटप केले. पालिका कर्मचाऱ्यांना पाहून एका व्यक्तीने तेथे पडलेला प्लास्टिकचा कागद तोंडावर मास्कसारखा लावला. ते पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला खरेदी करून मास्क वापरण्याची सूचना केली. पालिका कर्मचाऱ्यांनी यावेळी एपीएमसीत येणाऱ्या-जाणाऱ्यांना कोरोनाचा आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत माहिती देऊन जागृकता निर्माण केली.


Recent Comments