Belagavi

बीजगर्णी ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा

Share

बेळगाव तालुक्यातील बीजगर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा झाला असून सदर मतमोजणी बेकायदेशीर झाल्याची तक्रार करत ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. सदर निवडणुका पुन्हा एकदा घेण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दि. २७ डिसेंबर रोजी झालेल्या ग्राम पंचायत पोटनिवडणुका सुरळीतपणे पार पडल्या. निवडणुकीनंतर मतमोजणी प्रक्रियेपूर्वी ताशिलदार कार्यालयातील स्ट्रॉन्ग रूममध्ये मतपेट्या पोलिसांच्या उपस्थितीत नेण्यात आल्या. ३० डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणी प्ररकियेत बीजगर्णी, कावळेवाडी, यळेबैल, राकसकोप पोलिंग एजंटांनी काऊंटिंग सेंटरकडे जाऊन आधीच मतपेट्या उघडल्याचे निदर्शनास आले आहे. याचा जाब एजंटना विचारण्यात आला असता मतपेट्या उघडण्यात आल्याचं नसल्याचे त्यांनी सांगितले.

मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर प्रत्येक मतपेटीत अधिक मते असल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारण्यात आल्यास असे होऊ शकते असे सांगण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना विचारण्यात आल्यास या विषयात आपण काहीच करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडेही करू शकता असे उत्तर आपल्याला दिले गेले असल्याचा आरोप ग्रामस्थानी केलाय.

यासंदर्भात गावातील नेते विनय कदम यांनी ही मतमोजणी प्रक्रिया बेकायदेशीर झाल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी ही निवडणूक पुन्हा एकदा घ्यावी, असा आग्रह केला.

या आंदोलनात बीजगर्णी ग्रामपंचायतीचे अनेक नेते सहभागी झाले होते.

Tags: