Nippani

निपाणी नगरवासीयांसाठी मोफत रुग्णवाहिका दाखल

Share

निपाणी शहर समुदाय आरोग्य केंद्रात मोफत रुग्णवाहिका सेवेला चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याहस्ते सुरुवात करण्यात आली.

चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या व्याप्तीतील स्थानिक प्रदेश विकास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सदर रुग्णवाहिका निपाणी शहर समुदाय आरोग्य केंद्राकडे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सुपूर्द केली.

यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, या मतदार संघाच्या विकासासह जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. निपाणीमध्ये पुढील काळात जनतेच्या सोयीसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. याचा सदुपयोग जनतेने घ्यावा, या सेवेला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जोल्ले यांनी केले.

यावेळी अप्पर जिल्हा वैद्याधिकारी डॉ. एस. एस. गडाद, तालुका वैद्याधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. सीमा गुंजाळ, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, नगरपंचायत अध्यक्ष जयवंत भाटले, उपाध्यक्षा गीता बागडी आदी उपस्थित होते.

Tags: