Chikkodi

नणदीत बंधारा; हिरेकोडीत रस्ता कामाचा प्रारंभ

Share

चिक्कोडी तालुक्यातील नणदी गावाजवळ ओढ्यावर पुलवजा बंधारा बांधण्याच्या कोटी रुपये निधीच्या कामाचे तसेच हिरेकोडी येथे ६० लाख रु अनुदानातून रस्ता निर्मिती कामाला एमएलसी महांतेश कवटगीमठ यांनी चालना दिली

चिक्कोडी तालुक्यातील नणदी गावाजवळ ओढ्यावर पुलवजा बंधारा नसल्याने अनेक वर्षांपासून ऊस वाहतुकीला अडथळा येत आहे. त्याशिवाय शेतात घरे बांधून राहणाऱ्या लोकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महांतेश कवटगीमठ यांनी पुलवजा बंधाऱ्यासाठी पाटबंधारे खात्याकडून १ कोटी रुपये निधी मंजूर करवून घेतला आहे.

या कामाचे त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बी. एन. निंबाळकर, चंद्रकांत कोकणे, अभिजित नसोलनावर, रवी भिवशी, महेश बाकळे, सतीश शास्त्री, सुरेश खोत, रणजित पवार आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना महांतेश कवटगीमठ म्हणाले, असे १०० पुलवजा बंधारा बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३० पूर्ण झाले आहेत. शक्य झाल्यास उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

 

Tags: