Khanapur

खानापूरमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ

Share

खानापूरमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोविड लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.

या लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर संजय नांद्रे आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांद्रे यांनी लसीकरणासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच यासंदर्भात कोणती खबरदारी घ्यावी यासंदर्भात देखील माहिती डॉ. नांदे यांनी दिली.

यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: