Belagavi

बेळगाव जिल्ह्याच्या सीमांवर २३ चेकपोस्ट : जिल्हाधिकारी

Share

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आणि ओमीक्रॉनचा धुमाकूळ पुन्हा वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खबरदारी घेण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

बेळगावात रविवारी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, शेजारी राज्य महाराष्ट्रात ओमीक्रॉन विषाणू बाधितांची संख्या वाढत असल्याने राज्याच्या सीमांवर खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून बेळगाव जिल्ह्याच्या सीमांवर एकूण २३ तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही डोस लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. बाईट महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकातही ओमीक्रॉन विषाणू बाधित सापडले आहेत. त्यामुळे त्याचा फैलाव टाळण्यासाठी बेळगाव जिव्हा प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. त्याला जनतेनेही प्रतिसाद देण्याची गरज आहे.

Tags: