Accident

टमटम-टाटा एसरच्या धडकेत महिला ठार; ७ जखमी

Share

टमटम आणि टाटा एसर वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार तर ७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात विजापूर जिल्ह्यातील कोल्हारजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२वर कृष्णा नदी पुलावर घडला.

व्हॉइस : कोल्हारहून बागलकोट जिल्ह्यातील बिळगी येथे जाणाऱ्या टमटम आणि टाटा एसर वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. यात बिळगी तालुक्यातील होन्याळची रहिवासी धुंडव्वा सालगुंडी जागीच ठार झाली तर ७ प्रवासी जखमी झाले. जखमींवर बागलकोट येथील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अपघातामुळे ट्रॅफिक जॅम होऊन महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. कोल्हार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.टमटम आणि टाटा एसर वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार तर ७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात विजापूर जिल्ह्यातील कोल्हारजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२वर कृष्णा नदी पुलावर घडला.

कोल्हारहून बागलकोट जिल्ह्यातील बिळगी येथे जाणाऱ्या टमटम आणि टाटा एसर वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. यात बिळगी तालुक्यातील होन्याळची रहिवासी धुंडव्वा सालगुंडी जागीच ठार झाली तर ७ प्रवासी जखमी झाले. जखमींवर बागलकोट येथील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अपघातामुळे ट्रॅफिक जॅम होऊन महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. कोल्हार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

Tags: