खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी येथील अनिकेत पाटील याची हरियाणातील कैथाल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्टार कबड्डी स्पर्धेसाठी हरियाणा पँथर्स संघात निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपनेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्याचा सत्कार केला.

अनिकेतला शालेय जीवनापासून कबड्डीची आवड आहे. त्याने एम. जी. हायस्कुल, नंदगड येथून माध्यमिक तर खानापूर येथील रावसाहेब वागळे कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. त्याने अनेक स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गोवा येथे झालेल्या चाचणीत त्याने उत्तरकुष्ट कामगिरी बजावल्याने त्याची हरियाणा पँथर्स संघासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक स्पर्धेसाठी निवडला जाणारा खानापूर तालुक्यातील तो पहिलाच खेळाडू आहे. त्याच्या या यशाबद्दल भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्याचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी येथील अनिकेत पाटील याची हरियाणातील कैथाल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्टार कबड्डी स्पर्धेसाठी हरियाणा पँथर्स संघात निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपनेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्याचा सत्कार केला.
अनिकेतला शालेय जीवनापासून कबड्डीची आवड आहे. त्याने एम. जी. हायस्कुल, नंदगड येथून माध्यमिक तर खानापूर येथील रावसाहेब वागळे कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. त्याने अनेक स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गोवा येथे झालेल्या चाचणीत त्याने उत्तरकुष्ट कामगिरी बजावल्याने त्याची हरियाणा पँथर्स संघासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक स्पर्धेसाठी निवडला जाणारा खानापूर तालुक्यातील तो पहिलाच खेळाडू आहे. त्याच्या या यशाबद्दल भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्याचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments