Belagavi

१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीनांना आजपासून लस

Share

सरकारच्या आदेशानुसार उद्यापासून १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन युवक-युवतींचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात येईल असे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले.

व्बेळगावात आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, सोमवारपासून सुरु होणाऱ्या १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन युवक-युवतींच्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, जिल्हा, तालुकास्तरीय आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी मिळून १७८ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सर्व १८ विधानसभा मतदारसंघात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. बेळगावातील एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयात उद्या पालकमंत्री कारजोळ यांच्याहस्ते मोहिमेचे उदघाटन करण्यात येईल. पालकांनी कोरोना रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी उपाय असल्याचे मुलांना समजावून सांगून लस घेण्यास भाग पाडावे असे आवाहन त्यांनी केले.

Tags: