बेळगावातील सदाशिवनगरात रविवारी सर्वलोक सेवा फौंडेशनतर्फे देव–देवतांच्या भग्न मूर्ती आणि प्रतिमांचे संकलन करण्यात आले.

बेळगावातील सदाशिवनगरातील विविध भागांत, मंदिरांच्या आवारात टाकून दिलेल्या देव-देवतांच्या भग्न मूर्ती आणि प्रतिमांचे सर्वलोक सेवा फौंडेशनतर्फे संकलन करण्यात आले. तसेच ग्लास हाउसजवळ सोडून दिलेल्या भग्न मूर्ती आणि प्रतिमांचेही संकलन करण्यात आले. नंतर त्यांचे विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले. फौंडेशनचे अध्यक्ष वीरेश बसैया हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. 
वीरेश हिरेमठ यांच्या या उपक्रमात देवाप्पा कांबळे, महेश रेड्डी यांच्यासह स्थानिक रहिवाशांनीही भाग घेतला.


Recent Comments