महाराष्ट्राच्या 10 मंत्री तसेच 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली असून, आणखी रुग्ण वाढले तर कठोर निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील कोरोनाचा आकडा 10 हजारांकडे वाटचाल करत आहे. सध्या राज्यात 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. तसेच ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढली तर नियम आणखी कठोर करू, तारतम्य बाळगा, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
राज्यात 8,067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 5,428 रुग्णांची नोंद झाली आहे. तर ओमायक्रॉनचे आतापर्यंत 454 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. अनेक ठिकाणी मास्क वापरला जात नाही, असे दिसून येत आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी गर्दी होत असून कोरोना खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे तारतम्य बाळगूबन वागा, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. रुग्णांची संख्या वाढत राहिली तर निर्बंध कठोर करावे लागतील असे ते म्हणाले.
विधीमंडळात कोरोना
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्यातील 10 मंत्री तसेच 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली असून, आणखी रुग्ण वाढले तर कठोर निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.


Recent Comments