राज्य लिंगायत कर्मचारी संघाच्यावतीने २०२२ सालच्या कॅलेंडरचे माजी मंत्री एम बी पाटील यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.

विजापूर शहरातील आपल्या निवासस्थानी गुरुवारी कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. माजी मंत्री एम बी पाटील यांनी सांगितले कि, कॅलेंडरमध्ये बसव तत्त्वाचे विधी समाविष्ट करण्यात आले आहेत, लिंगायत कर्मचारी संघाला सुदृढ करण्याच्या उद्देशाने या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले आहे.
यावेळी राज्य लिंगायत कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष शिवराज कपलापुरे, युवा लिंगायत नेते, कर्नाटक विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष बसवराज कुमसगी, राज्य खजिनदार विजयकुमार मलशेट्टी, बिदर जिल्हाध्यक्ष रामशेट्टी केंचा, राज्य संघटना सचिव शरणबसव लंगोटी, विजापूर जिल्हाध्यक्ष सुधाकर बिरादार इंडी, बिदर तालुका अध्यक्ष संगरायाप्पा बिरादार, जिल्हा सहसचिव राजकुमार बिरादार, औराद तालुक्याचे उपाध्यक्ष दयानंद मनमी, विजापूरचे गुरु पाटील, मलु खेडगी आदी उपस्थित होते. (फ्लो)


Recent Comments