कुत्र्याला घरातून बाहेर काढल्याने रागाच्या भरात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने आपल्या कुत्राच्याच गळ्यातील साखळीने गळफास घेत आपले जीवन संपवले. मध्यप्रदेशातील छतरपुर येथे ही घटना उघडकीस आली. जेव्हा कुत्र्याने जोर-जोरात भूंकणे सुरू केले तेव्हा, मुलाने आत्महत्या केल्याचे आईला समजले. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कमलेश असुन तो 38 वर्षांचा होता.

कुत्र्यावरुन झाला होता वाद
कमलेश आणि त्याची आई (वय 65) या दोघांचे कुत्रावरुन भांडण झाले होते. कमलेश आपली आई शांती मसीही आणि आपल्या डॉगीसोबत घरात राहत असे. कुत्र्याने कमलेशच्या आईचा चावा घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या आईने मुलगा कमलेशला कुत्रा चावत आहे, त्यामुळे त्याला घरातून लांब सोडून ये असे सांगितले. त्यावर ‘मी स्वत: जीव देईल परंतू या कुत्र्याला माझ्यापासून लांब करणार नाही.’ असे कमलेशने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर आई आणि मुलामध्ये वाद झाला. रागाच्या भरात कमलेश घरातून निघून गेला. कमलेशची आई शांतीने सांगितले की, आमच्या दोघात वाद झाल्यानंतर कमलेश बाहेर गेला होता. त्यानंतर काही वेळाने कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. जेव्हा मी घराबाहेर गेले तेव्हा कमलेश फासावर लटकलेला होता.
कमलेशला भाऊ सुनिलने सांगितले की, कमलेश कोणत्याही परिस्थितीत कुत्र्याला स्वत:पासून लांब ठेवण्यास तयार नव्हता. आम्ही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, ही आमची सर्वात मोठी चुकी झाली.


Recent Comments