एकसंबा नगरपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यात काँग्रेसला यश आले आहे. नुकत्याच झालेल्या एकसंबा नगरपंचायत निवडणुकीत प्रकाश हुक्केरी गटाची सरशी झाली आहे.

होय, चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा नगरपंचायतीची निवडणूक माजी. खा. प्रकाश हुक्केरी आणि विद्यमान खा. अण्णासाहेब जोल्ले गटासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. आज झालेल्या मतमोजणीत हुक्केरी गटाने एकहाती विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले. एकूण १७ जागांपैकी १६ जागा काँग्रेसने मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
चिक्कोडी तालुक्यातील राजकारणात प्रभावी असणाऱ्या हुक्केरी आणि जोल्ले या २ घराण्यांत या निवडणुकीवरून मोठी स्पर्धा झाली. दोन्ही घराण्यांसाठी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची ठरली होती. त्यात हुकेरी गटाने बाजी मारत आपले बळ सिद्ध केले आहे.


Recent Comments