बेळगावच्या सुवर्णसौध येथे सन २०२२ च्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारी सुवर्ण सौध मधील सेंट्रल हॉल येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम २०२२ च्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-१९ व्यवस्थापन आणि आरसीएच कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी सर्व्हेलाईनचे वैद्याधिकारी डॉ. सिद्धलिंगय्या म्हणाले, गेल्या १० वर्षात अनेक देशांमध्ये पोलिओ प्रकाराने आढळून आली आहेत. भारतात अनेक कार्यकर्ते निरंतर लसीकरणाचे कार्य करत आहेत. हि गोष्ट काही कमी नसून पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पीपीटीच्या माध्यमातून पोलिओ कार्यक्रम यशस्वीपणे कसा राबवायचा यावर काम करत आहे. पोलिओमुळे पक्षाघाताचा धोकाही वाढण्याची शक्यता असून यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे सिद्धलिंगय्या म्हणाले.
यावेळी आरसीएचओ डॉ. ईश्वर गडाद यांनी पल्स पोलिओ कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, जगातील सर्व देशांतून पोलिओचे उच्चाटन करायचे असून पाकिस्तान, अफगाणिस्तान देशातून एक रुग्ण देखील शिल्लक राहता कामा नये तोवर हि मोहीम अशीच सुरु ठेवायची आहे असे ते म्हणाले. बेळगाव जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत ५०० कार्यकर्ते या कार्यशाळेत सहभागी झाले असून यांना डॉ. गडाद यांनी अधिक माहिती दिली.
या कार्यशाळेत डॉ. एस. एस. गडाद, डॉ. सतीश पोतदार, डॉ. संजय सिद्दण्णावर, डॉ. उदय कुडची, डॉ. एस. एन. बाने, डॉ. महेश चित्तरगी, डॉ. बसगौड कागे, डॉ. संजय नांद्रे आदींसह जिल्ह्यातील ५०० हुन अधिक आरोग्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments