रथोत्सवाच्या वेळी फोडलेल्या फटाक्यांची ठिणगी उडून रथानेच पेट घेतल्याची घटना रामदुर्ग तालुक्यातील शिवपेटे गावात घडली.

रामदुर्ग तालुक्यातील शिवपेटे गावात जडीशंकरलिंग देवाची यात्रा भक्तिभावाने साजरी करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी जडीशंकरलिंग देवाच्या ३८ व्या महारथोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी काही उत्साही भक्तांनी फटाके फोडले. त्यावेळी फटाक्याच्या ठिणगीमुळे रथाने पेट घेतला. ग्रामस्थांनी लागलीच धावाधाव करून आग विझविली. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. सुदैवानेच या घटनेत कोणाला अपाय झाला नाही.


Recent Comments