खानापूर तालुक्यातील बिडी ग्राम पंचायतीच्या १२ सदस्यांनी खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. अंजली निंबाळकर करत असलेले प्रयत्न, त्यांनी केलेली विकासकामे आणि जनसेवा यामुळे प्रभावित होऊन बिडी ग्राम पंचायतीच्या १२ सदस्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
संतोष कोशिलकर, सुनील कदम, बशीरा शिगेहळ्ळी, रुद्रप्पा तळवार, इम्रान समशेर, अबुतालिब बैलहोंगल, मंजुनाथ, विठ्ठल पत्री, दीप पाटील आदींनी आ. निंबाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आ. निंबाळकर यांनी आपल्या ‘रायगड’ या निवासस्थानी त्यांना पक्षध्वज देऊन पक्षात स्वागत केले. अलीकडेच कक्केरीतील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


Recent Comments