Belagavi

हुक्केरीत भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे आचरण

Share

हुक्केरी तालुक्यातील कोटबागी या गावात भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे आचरण करण्यात आले. यानिमित्ताने क्रिकेट स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या.

जय भीम क्रिकेट क्लब, कोटबागी, हुक्केरी तालुका विविध दलित संघटना संघ आणि जय भिर युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ बेळगाव जिल्हा अनुसूचित वर्ग अत्याचार समितीचे सदस्य सुरेश तळवार यांच्या हस्ते बुद्ध, बसव, आणि आंबेडकर प्रतिमापूजनाने करण्यात आला.

यावेळी सुरेश तळवार यांनी भीमा कोरेगाव लढ्याबद्दल माहिती देत या विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनुसूचित वर्ग अत्याचार समितीचे विभागीय सदस्य रमेश हुंजी, इ. ओ. उमेश सिदनाला, बसवराज खड्कभावी, पी. एस. आर. सिद्रामप्पा, कल्याण अधिकारी नागनुरे, उदय हुक्केरी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: