Belagavi

वाटाळ नागराजांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आंदोलन

Share

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्यात यावी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लगाम घालण्यात यावा, अशी मागणी करत राणी चन्नम्मा चौकात कन्नड आंदोलक वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली काही कन्नड संघटनांनी आंदोलन छेडले. राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वाटाळ नागराज म्हणाले, कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यरत राहू नये. समितीने महाराष्ट्रात कार्यरत रहावे, राज्योत्सवादिनी पाळण्यात येणारा काळा दिन असो किंवा अधिवेशनादरम्यान आयोजित करण्यात येणारा महामेळावा असो. या साऱ्या घटना राज्यविरोधी आहेत. यासाठी मंत्रिमंडळात याविषयावर चर्चा करून केंद्राकडे हि मागणी करण्यात यावी असा आग्रह करत ३१ डिसेम्बर रोजी पुकारण्यात आलेला बंद यशस्वी होणारच असे सांगत हा बांध सायंकाळी ६ वाजेपर्यंतच राहणार असल्याचे वाटाळ नागराज यांनी स्पष्ट केले.

https://www.facebook.com/innewsbelgaum/videos/4426853217422990

करवे संघटनेने या बंदला पाठिंबा दिला नसून यासंदर्भात प्रतिक्रिया देताना वाटाळ नागराज यांनी कोणत्याही परिस्थितीत हा बंद मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगितले. तसेच बंद पुकारण्यामागे अशोक चंदरगी गटाचा मी विचार केला नसल्याचेही वाटाळ नागराज म्हणाले.

महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदीसाठी खुद्द कन्नड संघटनांमध्येच संभ्रम आहे. कन्नड संघटनांमध्येही गट-तटाचे राजकारण सुरु असून येत्या ३१ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या कर्नाटक बंदची हाक यशस्वी होण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.

Tags: