Belagavi

क्लब रोडवर कचरा पेटवल्याने झाडाला आग

Share

 पौरकार्मिकांनी कचऱ्याच्या ढिगाला लावलेली आग झाडाला लागल्याची घटना बेळगावातील क्लब रोडवर मंगळवारी सकाळी घडली. सुदैवानेच यात प्राणहानी झाली नाही.

बेळगावातील क्लब रोडवर ज्योती कॉलेजच्या समोर शहरातून आणलेला कचरा मोठ्या वाहनात भरून तुरमुरी कचरा डेपोकडे पाठवण्यात येतो. त्याठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आज पौरकार्मिकांनी आग लावली. त्यामुळे तेथे असलेल्या झाडाने पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी पाणी मारून ही आग विझविली. अशाप्रकारे कचऱ्याच्या ढिगाला आग लावणे कितपत योग्य आहे असा सवाल स्थानिकांनी केला आहे.

Tags: