बंगळुरात समाजकंटकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर बेळगावात त्याचे प्रक्षोभक प्रतिसाद उमटले होते. या प्रकरणी अटक केलेल्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले.
शिवरायांच्या पुतळा विटंबनेनंतर बेळगावात वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. काही समाजकंटकांनी अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्याचा ठपका ठेवून पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यात म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांचा समावेश आहे. २७ जणांना अटक करून हिंडलगा तुरुंगात हलवण्यात आले होते. त्यांना १४ दिवसांची सुनावण्यात आली होती. त्या कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.
Recent Comments