Chikkodi

एकसंबा सामूहिक गुग्गुळ कार्यक्रमाची जोल्ले दाम्पत्याच्याहस्ते सुरुवात

Share

चिकोडी तालुक्यातील एकसंबा परिसरात ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सामूहिक गुग्गुळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले तसेच खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याहस्ते करण्यात आला.

एकसंबा परिसरात झालेल्या या समारंभात विविध लोककला-पथक संघांनी सहभाग घेतला होता. महादेव मंदिरापासून श्री ज्योतिबा मंदिरपर्यंत भक्तिपूर्ण वातावरणात ७० जोडप्यांनी सामूहिक गुग्गुळ उत्सवात सहभाग घेतला. यावेळी धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, तसेच ज्योतिप्रसाद जोल्ले आणि बसवप्रसाद जोल्ले यांच्याहस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, राज्याच्या हितासाठी असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांना सुख, समृद्धी आनंद मिळावा, अशी प्रार्थना करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी श्री बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष जयानंद जाधाव, संचालक आप्पासाहेब जोल्ले, कल्लाप्पा जाधव, ज्योती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत खोत, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: