बेळगावातील जुन्या पी. बी. रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांना येथून जीव मुठीत घेऊनच वाहने हाकण्याची वेळ आली आहे.

होय, एकेकाळी राज्य महामार्ग असलेला पण आजदेखील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा, वर्दळीचा असणारा ओल्ड पी. बी रोड बेळगावातील अनेक भागांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर तसेच तेथील पुलावर अनेक लहान–मोठे खड्डे पडले आहेत. अवघ्या ५ वर्षांपूर्वी बांधलेल्या या उड्डाण पुलाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
खड्ड्यांमुळे नागरिकांना येथून जाताना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात नागरिकांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे. फ्लो


Recent Comments