हुक्केरी शहरातील कोर्ट सर्कलच्या नूतनीकरण कामकाजाचा शुभारंभ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते पार पडला.

: सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सन २०२१-२२ च्या रस्ते सुरक्षा कामकाजाच्या अंतर्गत हुक्केरी तालुक्यातील संगम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील हुक्केरी शहराच्या सर्कल सुधारणा कामांचा शुभारंभ करण्यात आला.
कामकाजाचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश कत्ती म्हणाले, राज्य महामार्गावरील हुक्केरी शहराचा सुरक्षित प्रवास आणि विकासासाठी सुमारे ५ कोटी रुपयांच्या अनुदानातून कोर्ट सर्कल सुधारणा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कामकाजासाठी ज्यांची मालमत्ता गेली आहे, त्यांच्याशी चर्चा करून भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन कत्ती यांनी दिले.
यावेळी या कामकाजाची संपूर्ण माहिती हुक्केरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक संचालक गिरीश देसाई यांनी दिली. यावेळी नगरपालिका अध्यक्ष अण्णाप्पा पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयगौडा पाटील, प्रभाकर कामात, कंत्राटदार बसवराज मटगार, शिवकुमार मतगार, नगरपालिका उपाध्यक्ष आनंद गंध, सदस्य तसेच नेते सत्याप्पा नाईक, वकील संघाचे अध्यक्ष आर बी चौगुला आदी उपस्थित होते.


Recent Comments