देवगिरी गावातील स्मशानभूमी कब्जात घेण्यासाठी काहीजण प्रयत्नात असून गावची स्मशानभूमी वाचविण्यात यावी, असा आग्रह करत देवगिरी ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

बेळगाव तालुक्यातील देवगिरी या गावातील सर्व्हे क्रमांक १२३/८ मध्ये गावची स्मशानभूमी आहे. या गावची लोकसंख्या ३ हजार इतकी असून १५० वर्षांपासून येथील स्मशानभूमी या गावातील लोक वापरत आहेत. हि जमीन रस्त्याच्या कडेला असून सुपीक आहे. या जमिनीची किंमत आज वाढली आहे. याचाच गैरफायदा घेत काही स्वार्थी मंडळींकडून हि जमीन ताब्यात घेण्याचा विचार सुरु आहे. सदर जमीन मालकाचा मृत्यू झाला असून त्याच्या वारसदारांनी ग्रामपंचायतीत दावा दाखल केला आहे. या जागेवर कोणतीही विकासकामे करू नयेत अशी मागणी देवगिरी ग्रामस्थांनी केली असून अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आज सादर करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे, ग्रामपंचायत सदस्य गौडाप्पा पाटील यांनी. गेल्या १५० वर्षांपासून देवगिरी ग्रामस्थ या स्मशानभूमीचा वापर करत असून काही मंडळींकडून स्वार्थासाठी हि जमीन हडप करण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्या पूर्वजांपासून वापरण्यात येणारी स्मशान भूमी कोणत्याही कारणास्तव इतरांना देणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. (बाईट)
ग्रामस्थांच्या वतीने केपीसीसी सदस्य मलगौड पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, देवगिरी गावातील सर्व्हे क्रमांक १२३/८ हि जमीन सरकारी स्मशानभूमी म्हणून परिवर्तित केली पाहिजे. जोवर शासन या मागणीचा विचार करून पुढाकार घेत नाही तोवर आम्ही हि जमीन सोडणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिलाय.
यावेळी देवगिरी ग्राम पंचायत सदस्य रामाप्पा चुरमुरी, गौडाप्पा पाटील, बाबू पाटील, विश्वेश्वरय्या हिरेमठ, राजू सुतार, निंगाप्पा अंकी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments