Banglore

मुख्यमंत्री बदल हे प्रसारमाध्यमानी उठवलेले रान : मुख्यमंत्री बोम्मई

Share

 राज्यात मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही, हे सगळे प्रसारमाध्यमानी उठवलेले रान आहे, उर्वरित सत्ता काळात आणखी लोककल्याणाची कामे करून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी समोवारी पत्रकारांशी बोलताना कोविड बळींच्या वारसांना भरपाई देण्यास ७ महिने विलंब का झाला या प्रश्नावर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, त्यासाठी काही कागदपत्रे, दाखल्यांचीगरज असते. २ महिने विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. आता राज्यात सगळीकडे भरपाई देत आहोत. काही तालुक्यांत, जिल्ह्यांत जिल्हाधिकारी आणि आमदारांच्याहस्ते भरपाई धनादेश दिले आहेत.

नाईट कर्फ्यूला सर्व स्तरातून विरोध होत असल्याबाबत बोम्मई म्हणाले, या प्रश्नावर मी याआधीच उत्तर दिले आहे. लोकांच्या आरोग्य रक्षणाच्या दृष्टीनेच नाईट कफ्र्यु लागू केला आहे. व्यापार-उदीम , उद्योगधंदे सुरु रहावेत हीच आमचीही इच्छा आहे. आर्थिक स्थिती सुधारत आहे. पर्यटन स्थळांवर कोविड नियम पाळण्याची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले. बाईट हुबळीत उद्यापासून सुरु होणाऱ्या भाजप कार्यकारिणी सभेबाबत बोम्मई म्हणाले, उद्या सायंकाळी कोअर कमिटीची बैठक आहे. २९ ला राज्य कार्यकारिणीची सभा आहे. महिन्या-दोन महिन्यातून एकदा पक्ष कार्यकारिणीची सभा आम्ही घेतो. गेल्या वेळी दावणगेरी येथे सभा झाली होती. सतत कार्यकारिणी सभा घेणारा भाजप एकमेव पक्ष आहे. समकालीन विषयांवर चर्चा, पक्ष संघटन मजबूत करणे यासाठी या सभा घेऊन निर्णय घेतले जातात.

मुख्यमंत्री बदलाच्या प्रश्नावर बोम्मई पत्रकारांवर भडकले. हे सगळे तुम्हीच उठवता, तुम्हीच त्यावर प्रश्न करता असे सांगून राजकारणात काय करायचे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. जेंव्हा जी चर्चा करायची तेंव्हा ती करतो. हा पक्षाचा आंतरिक विचार आहे. बेळगाव विधान परिषद निवडणुकीत पसंखचं उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या रमेश जारकीहोळी यांच्यावर कारवाई करणार का या प्रश्नावर बोम्मई म्हणाले, पक्ष नेतृत्वाच्या सर्व काही निदर्शनास आले आहे. हायकमांड सगळ्यावर लक्ष ठेवून आहे. सरकार आणि पक्षात चांगला समन्वय आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या विकासकामांचा मुद्दा घेऊन आगामी निवडणुकीत जनतेसमोर जाऊ असे त्यांनी सांगितले.

एकंदर मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही, हे सगळे प्रसारमाध्यमानी उठवलेले रान आहे असे बोम्मई यांनी स्पष्ट केले.

 

 

 

Tags: