Vijayapura

मनगोळी पंचायतीच्या निवडणुकीत भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप

Share

 विजापूर जिल्ह्यातील नगर पंचायतींसाठी आज मतदान घेण्यात आले. त्यावेळी मनगोळी पंचायतीच्या निवडणुकीत भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत आहे.

होय, विजापूर जिल्ह्यातील मनगोळी नगरपंचायतीच्या आदल्या दिवशी रविवारी रात्री ११ च्या सुमारास पैसे वाटल्याची घटना घडली. २ मोटारसायकलवरून आलेले चौघेजण पैसे वाटताना आढळून आले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले. मात्र एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हातात नोटांची बंडले घेतलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. पकडलेल्या युवकांकडे भाजपचा ध्वज आणि नमुना मतपत्रिका आढळून आली आहे. यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच आ. शिवानंद पाटील आणि तहसीलदार एम. एन. बळगार यांनी भेट दिली. त्यांनी पीएसआयला फैलावर घेतले.

याबाबत प्रतिक्रिया देताना आ. शिवानंद पाटील यांनी पीएसआयच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे सांगून याबाबत त्वरित तपास करण्याची मागणी केली.

दरम्यान, पैसे वाटताना पकडलेल्या तिघांना पोलिसांनी २ मोटारसायकलींसह ताब्यात घेतले आहे. सखोल तपासानंतरच या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे.

 

 

 

Tags: