अंधश्रद्धेची मुळे समाजात अजूनही किती खोलवर रुजली आहेत याचे प्रत्यंतर देणारी घटना रायबाग तालुक्यातील मुगळखोड येथे आज उघडकीस आली. नगरपंचायत निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या घरासमोर चक्क करणीबाधा करण्यात आली.

होय, मुगळखोड येथे मतदान केंद्राला जाणाऱ्या रस्त्यावरील काँग्रेस उमदेवराच्या घरासमोर लिंबू, नारळ, हळदी-कुंकू ठेवून कोणीतरी अज्ञाताने ही करणीबाधा केली आहे. काँग्रेस उमेदवार संजय कुलगोड यांच्या घरासमोर अज्ञातांनी करणीबाधेचे हे साहित्य रात्रीच्यावेळी ठेवतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे.
काँग्रेस उमेदवार कुलगोड यांचा निवडणुकीत पराभव व्हावा या हेतूने हा हास्यास्पद प्रकार अज्ञातांनी केला असावा अशी चर्चा या परिसरात सुरु आहे. दरम्यान, कुलगोड यांच्या समर्थकांनी पाण्याचा टँकर मागवून घरासमोरील परिसराचे शुद्धीकरण केले.


Recent Comments