चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले आणि खा. अण्णासाहेब जोल्ले यांनी आज वार्ड नं. ९ मधील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

एकसंबा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले आणि खा. अण्णासाहेब जोल्ले यांनी आपली मुले ज्योतिप्रसाद आणि बसवप्रसाद यांच्यासमवेत आज वार्ड नं. ९ मधील सरकारी कन्नड शाळा मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तत्पूर्वी जोल्ले कुटुंबीयांनी श्री बिरेश्वर देवाचे दर्शन घेतले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या एका चांगल्या नेत्याला निवडण्यासाठी मी मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकांनीही मतदानाच्या घटनात्मक हक्काचा वापर करून मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments