विजापूर जिल्ह्यातील ६ नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर एका ९० वर्षीय आज्जीबाईनी मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

होय, विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज झालेल्या मतदानात एका ९० वर्षीय आज्जीबाईनी मतदानाचा हक्क बजावून सगळ्यांनाच अचंबित करून सोडले. नागम्मा इंगळगी असे या आजीबाईंच्या नाव आहे. त्यांनी नालतवाड नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्र. २मधील मतदान केंद्र क्र. २वर सोमवारी मतदान केले. वयामुळे आजारी असूनही त्यांनी मतदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.


Recent Comments