Belagavi

शेतकऱ्यांच्या जमिनीवर आखलेल्या रेल्वे योजनेवर संताप

Share

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर राजकारण्यांचा डोळा असून शेतजमिनीवर आखण्यात आलेल्या योजना या योग्य नसल्याचे मत कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हसीरू सेनेचे राज्याध्यक्ष चोन्नप्पा पुजारी यांनी व्यक्त केले आहे.

सोमवारी बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार मंगला अंगडी यांनी दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न केला असून राजकारण्यांनी शेतकऱ्यांचा जमिनीवर डोळा ठेऊन शेतकऱ्यांची समाधी योजना आखली आहे, अशा शब्दात चोन्नप्पा पुजारी यांनी संताप व्यक्त केला. बेळगावपासून धारवाड पर्यंत नियोजित रेल्वे मार्ग योजना उत्तम आहे. परंतु यासाठी सुपीक जमिनींचा वापर करण्यासाठी आपला विरोध आहे. खासदार मंगला अंगडी यांनी जाणीवपूर्वक के के कोप्प येथील टेकडीवरून जाणाऱ्या मार्गाऐवजी सुपीक जमिनींचा मार्ग निवडला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

चोन्नप्पा पुजारी पुढे म्हणाले कि, बेळगाव, धारवाड जनतेची अनेक वर्षांपासून हा रेल्वे मार्ग व्हावा, अशी मागणी होती. बेळगाव कित्तूर मार्गावरून धारवाडला जाणाऱ्या मार्गाची योजना स्वागतार्ह आहे. परंतु केवळ बेळगाव धारवाड नाही तर कोल्हापूर मार्गावर देखील हि योजना कार्यान्वित व्हावी, अशी मागणी पुजारी यांनी केली. बेळगावपासून कित्तूर मार्गावरील धारवाड योजनेमुळे देसूर, केकेकोप्प येथील नियोजित मार्गामुळे संपूर्ण काळी सुपीक जमीन, अल्पभूधारक शेतकरी, ऊस उत्पादक असलेल्या गर्लगुंजी, देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी आदी आसपासच्या परिसरातील नागरिक शेतीवरच अवलंबून आहेत. या नियोजित मार्गामुळे या भागातील संपूर्ण शेतकरी समाज अडचणीत येईल, असे पुजारी म्हणाले.

यावेळी आमच्या इन् न्यूज ला प्रतिक्रिया देताना मारुती लोकूर म्हणाले, देसूरपासून केले कोप्प परिसरातील जमीन हि सुपीक आहे. यामुळे टेकडीच्या बाजूला असलेली जमीन या योजनेसाठी घेण्यात यावी, अशी मागणी दिवंगत सुरेश अंगडी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावेळी खाजगी सर्व्हे करून अहवाल देखील देण्यात आला होता. त्यानंतर खासदार मंगला अंगडी यांनाही निवेदन देण्यात आले. परंतु खासदार हट्टाला पेटून हि योजना कार्यान्वित करत आहेत, याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला/.

या पत्रकार परिषदेला प्रकाश नाईक, राघवेंद्र नाईक, नरेंद्र पाटील, प्रसाद पाटील, संगप्पा कंबार आदी उपस्थित होते.

Tags: