Banglore

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचा शुभारंभ

Share

 

कर्नाटकासाची राजधानी असलेल्या बेंगळूर शहरात आजपासून इलेक्ट्रिक बस आणि बीएस- ६ डिझेल बस संचार करणार आहे. या बसेसचा शुभारंभ आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते करण्यात आला.

विधानसौध परिसरात बेंगळूर परिवहन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ९० इलेक्टिकल आणि २६५ बीएस-६ बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखविण्यात आला. दीड तासाच्या चार्जिंग नंतर तब्बल १८० किलोमीटरपर्यंत हि बस धावू शकते. या बसमध्ये लाऊडस्पिकर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था आहे. प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. हि बससेवा मेट्रो फिडर सह केंगेरी, यशवंतपूर, केआरपूरम विभागात सुरु करण्यात आली असून बीएस- ६ वससेवा राज्यात प्रथमच सुरु करण्यात आली असून या बसमुळे प्रदूषणाची समस्या कमी होणार आहे. बससेवेचा शुभारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, परिवहन मंत्री श्रीरामुलू, सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर आदींनी बसमधून संचार केला.

यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकारी सबसिडी देणे यात काही अर्थ नाही. आपली संस्था कशापद्धतीने आर्थिक सुदृढ होईल, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. नव्या कार्यप्रणालीचा माध्यमातून आपण पुढे गेले पाहिजे. जर खाजगी वाहतूक सेवा नफ्यात येऊ शकतात तर सरकारी वाहतूक सेवा का नफा कमावू शकत नाहीत? परदेशात सरकारी वाहतूक सेवेचा वापर अधिक केला जातो. आपणही त्याच तत्वांवर काम करून प्रगती साधावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या कार्यक्रमाला खासदार पी सी मोहन, बीएमटीसी अध्यक्ष सतीश रेड्डी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: