Belagavi

मनोरुग्ण महिलेचा बेळगावात चांगलाच हायड्रामा

Share

बेळगावातील रामदेव गल्लीतील एका दुकानात घुसून मनोरुग्ण महिलेने हे दुकान आपलेच असल्याचे सांगत गोंधळ घातल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

होय, बेळगावातील रामदेव गल्लीतील एका फॅब्रिक दुकानात गुसून एका मनोरुग्ण महिलेने चांगलाच हायड्रामा केला. दुकानदाराने तिला बाहेर जाण्यास सांगितल्यावर हे दुकान माझेच आहे असे सांगत तिने बाहे जाण्यास नकार दिला. त्याशिवाय आरडाओरडा करत गोंधळ माजविला. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी जमली. दुकानदाराने याची माहिती खडेबाजार पोलिसांना दिली. अखेर महिला पोलिसांनी कसेवसे त्या महिलेला तेथून हुसकून लावले.

 

 

Tags: