Belagavi

‘बेळगाव आनंदमेळा’ रोबोटिक बर्डस एक्झिबिशन सुरु

Share

फन फेअर, एक्झिबिशन म्हटले की, बेळगावकरांच्या त्यावर उड्या पडतात. असेच एक इंटरनॅशनल रोबोटिक बर्डस एक्झिबिशनबेळगाव आनंदमेळाया नावाने बेळगावात भरविण्यात आले आहे. चला तर त्याची सैर करूयात   

सुमारे अडीच वर्षानंतर बेळगावकरांना फुल्ल फॅमिली एन्जॉयमेंट करण्याची संधी मिळत आहे. बेळगावातील सीपीएड कॉलेज ग्राऊंडवर प्रथमच इंटरनॅशनल रोबोटिक बर्डस एक्झिबिशन ‘बेळगाव आनंदमेळा’ या नावाने भरविण्यात आले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण निसर्गाच्या, पक्षी, प्राण्यांच्या सहवासात घालविण्याचा आनंद या एक्झिबिशनमध्ये घेता येणार आहे. वेगवेगळे पक्षी कशा पद्धतीने वेगवेगळे आवाज काढतात, हे रोबोटिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखविण्यात येते. प्रवेशद्वारावरच भव्य आकारातील गरुड, मोर, गिधाड अशा विविध पक्षांच्या, केरळमधील हत्तीच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेतात. तर आत गेल्यावर  मिनी बाईक रायडींग, ड्रॅगन ट्रेन, जायंट व्हील यासह मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत. प्रदर्शन पाहण्यास आलेले लोक त्याचा आनंद घेत सेल्फी घेताना दिसत आहेत.

यावेळी ‘आपली मराठी’सोबत बोलताना आयोजक यश कम्युनिकेशन्स अँड मॅनेजमेंटचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी सांगितले की, पहिल्या दोनच दिवसांत या एक्झिबिशनला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. रोबोटिक तंत्रज्ञानातून साकारलेले ५० हुन अधिक देश-परदेशातील पक्षी येथे पाहता येतात. लहान-मोठ्यांना आनंद घेता येतील असे जायंट व्हील सारखे खेळही उपलब्ध आहेत. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मोठे फूड पार्क आहे. सर्वानी एकीकडं या ऍम्युजमेंट पार्कला भेट देऊन आनंद लुटावा असे आवाहन प्रकाश कालकुंद्रीकर यांनी केले.

 येथे भेट दिलेल्या प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही अनेक एक्झिबिशन्स पहिली आहेत. पण बेळगावात प्रथमच अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण रोबोटिक्स एक्झिबिशन पाहून आम्ही खूप एन्जॉय केला. असे उपक्रम बेळगावात वरचेवर घ्यायला हवेत. बाईट गेल्या २ वर्षांत कोविडमुळे आम्हाला कुठेही बाहेर जाण्याची मनोरंजनाची संधी मिळाली नाही. या एक्झिबिशनमध्ये सहभागी होऊन आम्ही खुश झालो अशी प्रतिक्रिया लहान मुलांनी दिली. बाईट एकंदर, कोरोनानंतर रिलॅक्स मूडमध्ये येत बेळगावकर बेळगाव आनंदमेळ्याचा आनंद लूट आहेत. तुम्हीही एकदा येथे भेट देऊन अवश्य याचा आनंद लुटा हाच आमचा सल्ला.

Tags: