Belagavi

मनीषा उपाध्ये यांना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पुरस्कार

Share

माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त किशोरी लाल फौंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात इन न्यूजच्या हिन्दी बुलेटिनच्या माजी अँकरसब एडिटर, टीवी प्रोड्यूसर, तसेच आशियातील पहिल्या महिला चॅनेलच्या प्रोग्रामिंग हेड मीडिया विश्वातील चर्चित नाव मनीषा उपाध्ये यांना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पुरस्कार-2021 ने सम्मानित करण्यात आले.

23 डिसेंबर रोजी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये फौंडेशनचे अध्यक्ष कुलदीप शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात प्रमुख पाहुणे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्याहस्ते उपाध्ये यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गौरव अतिथि राजभाषा विभागाच्या संचालिका मंजुळा सक्सेना, दूरदर्शनच्या माजी संचालिका नीलम महाजन, चंद्र मोहन पपनैं, हवीब अख्तर, वरिष्ठ पत्रकार एस. एफ. आसिफ, दिल्लीचे वरिष्ठ भाजप नेता जगदम्बा सिंह उपस्थित होते.

यावेळी ‘भारताच्या नवनिर्माणात आत्मनिर्भर भारत योजनेचे योगदान’ या विषयावर सेमिनार तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Tags: