5th मराठा लाईट इन्फंट्री रॉयलचा 222 वा रायझिंग डे आणि 50th सुद्धी बॅटल ऑनर यांच्या संयुक्त विद्यमाने 5th रॉयल वेटरन असोसिएशनच्या माजी सैनिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बेळगावातील लोकमान्य भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी सुभेदार मेजर पांडुरंग शिवणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करुन त्यांचा परिचय करून दिला .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल मार्टिन, कर्नल डिसोजा, मेजर वरूण, कॅप्टन संभाजी देसाई, कॅप्टन उमाकांत नाईक, कॅप्टन वसंत राणे, सुभेदार मेजर सुरेश पाटील उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कॅप्टन अरुण सावंत आणि मेजर हेमंत गुरव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्वांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषाने सभागृह दणाणून सोडले.
यावेळी कोरोना काळात शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर 1971 मध्ये झालेल्या लढाईत सहभाग घेतलेल्या पाचव्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या सैनिकांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी 5th रॉयल्स वेटरन असोसिएशन बेळगावचे अध्यक्ष कॅप्टन प्रकाश झेंडे यांनी उपस्थित जवानांना 222 व्या रायझिंग डेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच 1971 मध्ये झालेल्या युद्धाची माहिती जवानांना दिली.
या कार्यक्रमाला 5th मराठाचे बेळगाव, कोल्हापूर, सावंतवाडी, सांगली, हुबळी, बैलहोंगल, निपाणी, बेंगलोरचे जवान आणि माजी सैनिक उपस्थित होते.


Recent Comments