राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेची वार्षिक सर्व साधारण सभा आज बेळगावात पार पडली.

बेळगावातील सदाशिवनगरातील चौगुले बिल्डिंगमध्ये शनिवारी राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेची वार्षिक सर्व साधारण सभा आज बेळगावात पार पडली. या सभेत कोविडने निधन झालेल्या पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. फ्लो
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे म्हणाले, आमच्या संस्थेतर्फे समाजाला काहीतरी देण्याच्या दृष्टीने काय करणार हे जाहीर केले नव्हते. त्यामुळे त्याबाबत कोणाला काही माहिती नाही. आम्ही संस्थेतर्फे स्वतःचे असे पत्रकार भवन निर्माण करायचा निर्धार केला आहे. सरकारनेही त्यासाठी मदत दिली आहे. सुमारे ५ कोटी रुपये खर्चातून रेड्डी भवनच्या धर्तीवर विध्यार्थी वसतिगृहासह पत्रकार भवन उभारण्याचा विचार सुरु आहे असे कुरुंदवाडे यांनी सांगितले. 
यावेळी बोलताना श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष भीमशी जारकीहोळी म्हणाले, विधानसौधच्या धर्तीवर राज्यात आदर्श ठरेल असे भव्य पत्रकार भवन उभारण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही जागेच्या शोधात आहोत. सुमारे ५ हजार परदेशी भारतीयांचा बेळगावात मेळावा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी असा मेळावा घेण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले 
यावेळी इन न्यूज वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक राजशेखर पाटील, पत्रकार पुंडलिक काळोजी, यल्लाप्पा तळवार, सुभानजी मुल्ला, सुकुमार बन्नुरे, सुरेश पाटील, तन्वीर पटेल आदी पत्रकार उपस्थित होते.


Recent Comments